kolhapur


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भय पाठीवर असतानाच कोल्हापुरात (kolhapur) चिकुनगुनिया विषाणूबाधित सांधेदुखी आणि डेंग्यूने (dengue) शहरवासीयांना बेजार केले (flu) आहे. घरोघरी रुग्णांचे कण्हणे सुरू असून, दवाखानेही अशा रुग्णांनी ओसंडून वाहू लागले आहेत. डासांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या या संसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी शहराच्या स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. यासाठी महानगरपालिकेने आणि नागरिकांनी तातडीने जागरूकता दाखविली नाही तर कोल्हापूरकरांसाठी हे आव्हान महाग पडू शकते.

ताप, अंगदुखी, सांधे आखडून येणे, अशक्तपणा आणि प्रसंगी उठणे-बसणेही मुश्किल होणे अशी या रोगांची लक्षणे आहेत. थंडीचा कडाका सुरू होत असतानाच अंग आणि सांधेदुखीशी संबंधित असलेला हा आजार रुग्णांना सहन करण्यापलीकडे जातो आहे. या रुग्णांच्या रक्ताची चाचणी केली असता चिकुनगुनिया, डेंग्यू (dengue) या आजारांची बाधा झाल्याचे स्पष्ट होते (flu) आहे, तर काही ठिकाणी या चाचण्या निगेटिव्ह येऊनही रुग्णाच्या अंगात मात्र संबंधित आजाराची लक्षणे दिसताहेत. 


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का


या रुग्णाच्या लक्षणांवर आधारित उपचार केला जातो आहे. आठवडाभर वेदना सहन करून रुग्ण थोडे बरेही होत असल्याचे चित्र असले तरी बहुतेकांच्या अंगात हा आजार महिना-महिना मुक्काम ठोकत असल्याने प्रामुख्याने डासांपासून होणाऱ्या या आजाराला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा एकच पर्याय सध्या नागरिकांपुढे आहे.

डासांचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे योगदान तर महत्त्वाचे आहेच. परंतु, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी मोठी असते. डासांची उत्पत्ती वाढली, त्यांच्याद्वारे विषाणूंचा संसर्ग फैलावू लागला तर कीटकनाशकांची फवारणी करणे, साचलेले पाणी प्रवाही करणे, अस्वच्छ पाण्याची डबकी नष्ट करणे, आदी उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करणे कायद्याने अनिवार्य आहे. 

त्यासाठी सार्वजनिक स्वच्छता विभागांतर्गत कीटकजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी एक स्वतंत्र प्रशिक्षित फळी कार्यरत ठेवावी लागते. कोल्हापूर शहराला गेली 10 वर्षे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांनी वेढले असतानाही दुदैवाने कोल्हापूर महापालिकेत मात्र अशी कोणतीही फळी अस्तित्वात नाही.