kolhapur-coronavirus-update

(coronavirus update) रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर (Rtpcr) आणि सीबीएनएएटी चाचणीचे ३७१३ प्राप्त अहवालापैकी ३६९९ निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह १२ आहेत.(२ अहवाल नाकारण्यात आले) न्टीजेन चाचणीचे ९३ प्राप्त अहवालापैकी ९१ निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये १०८ प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह १०३ तर ५ पॉझिटिव्ह,

असे एकूण १९ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४९ हजार४० पॉझिटिव्हपैकी ४६ हजार ९२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ४३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त १९ पॉझिटिव्हअहवालापैकी आजरा ३, गडहिंग्लज- १, हातकणंगले -१, कागल- १, करवीर-३, पन्हाळा-३, नगरपरिषद क्षेत्र - २, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३ व इतर शहरे व राज्य २ असा समावेश आहे. जिल्ह्यातील ४९ हजार ०४० पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ४६ हजार ९२८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून १ हजार ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात ४३४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.