coronavirus patient in kolhapur


kolhapur जिल्ह्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या (coronavirus)नवीन २७ रुग्णांची नोंद झाली तर दोघा वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला एक रुग्ण भुदरगड तालुक्यातील भडगांवचा तर दुसरा करवीर तालुक्यातील उचगांव येथील आहे.

शुक्रवारी कोल्हापूर (kolhapur) शहरात ११ तर नगरपालिका हद्दीत चार रुग्ण तसेच गडहिंग्लज तालुक्यात दोन, चंदगड, करवीर, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यात प्रत्येकी एक रुग्णाची नव्याने भर पडली तर भुदरगड, आजरा, गगनबावडा, हातकणंगले, कागल तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८ हजार ६६४ इतकी झाली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४६ हजार ३८४ इतकी झाली आहे. सध्या ६५४ रुग्ण जिल्ह्यात विविध रुग्णालयांतून उपचार घेत आहेत.

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी