martyr


जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानकडून  झालेल्या भ्याड हल्ल्यात निगवे खा.ता.करवीर येथील जवान संग्राम पाटील हा शहीद (martyr) झाला आहे. शनिवारी रात्री राजौरी सीमेवर ही चकमक झाली .गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणात हुतात्मा झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

सैन्य दलात 16 मराठा बटालियन मध्ये तो सेबेत होता. पाटील कुटुंबाचा एकूलता एक असलेला शूर जवान संग्राम सीमेवर शहीद झाल्याने पाटील कुटुंबीया वर दुखा चा डोंगर कोसळला आहे. वीर जवान ऋशिकेश जोंधळे शहोद झाल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुर जिल्ह्यात सलग दुसरा जवान शहीद झाला आहे. शहीद जवान संग्राम पाटील याला हवालदार म्हणून बढती मिळाली होती.त्याच्या मागे  आई वडील पत्नी दोन मुले  बहिनी असा परिवार आहे.

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन