kolhapur-3-people-tried-supplying-ganja

कोल्हापूरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jailधक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. इथं टेनिस बॉल मधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहचवण्याचा इऱादा असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्यांदाच कारागृहात गांजा पुरवणाऱ्या टोळीचा पदार्फाश झाला आहे.

गांजा (Hempपोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. तीन संशियत तरुण टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरत असत. कापलेले टेनिस बॉल पुन्हा चिटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा प्लॅन उधळून लावला.

Must Read

1) आयपीएल इतिहासात हा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

2) सेहवागची बुमराहबद्दलची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली

3) अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!

4) IPL 2020 : आयपीएलची किंग मुंबईच...

5) Asusने लाँच केले 4 नवे लॅपटॉप


पोलिसांनी या कारवाईत कापून पुन्हा चिकटवलेले टेनिस बॉल आणि 15 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तर या प्रकरणी वैभव कोठारी,संदेश देशमुख आणि अमित पायगुडे असा तीन संशतियांना अटक केली आहे. तिघेही संशतिय पुण्याचे असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच, याआधीही कारागृहात गांजा पोहचवला गेला होता का? याचा शोध सुरू आहे.