know-about-bank-holiday-list-novembe

नोव्हेंबर महिना सुरु झाला असून या महिन्यांत दिवाळी, छटपूजा, गुरुनानक जयंती आदी उत्सव येत आहेत. इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बँकांना सर्वाधिक सुट्ट्या मिळणार आहे त्यामुळे बँकेची कामे आत्ताच उरकून घ्या.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

नोव्हेंबर महिन्याची सुरुवातच सुट्टी ने झाली आहे. १ नोव्हेंबरला रविवार आहे. या दिवशी आठवडी सुट्टी असते. त्यानंतर संपूर्ण आठवडा बँकांना सुट्टी नाही. ८ नोव्हेंबरला पुन्हा रविवार असल्याने राज्यातील बँकांना सुट्टी असेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दि १३ रोजी वांगाला उत्सव असल्याने शिलॉंगमध्ये बँकांना सुट्टी असेल. यानंतर १४ नोव्हेंबरला दिवाळी आणि १५ नोव्हेंबरला रविवार असल्याने राज्यातील बँकांना सुट्टी असले. १६ नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने अधिकतम बँकांचे कामकाज होणार नाही.

१७ ते १८ नोव्हेंबरला सिक्कीममध्ये बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण, येथे १६ ते १८नोव्हेंबरपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. यानंतर २० ते २१ नोव्हेंबर दरम्याम छटपूजेचा उत्सव असल्याने बिहार आणि झारखंड मधील बँका बंद असतील. तसेच २२ नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्वच राज्यात बँकांना सुट्टी असेल. २३ नोव्हेंबरला शिलॉंगमध्ये बँका बंद असतील तर २८ नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने अधीकांश राज्यात बँकांना सुट्टी असेल. २९ नोव्हेंबरला रविवार आहे , तर ३० नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे त्यामुळे अधीकांश राज्यात बँकांना सुट्टी असेल.