
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने केलेल्या १२ सदस्यांच्या शिफारशीतील २ ते ३ नावे वगळून इतर नावे राजभवनकडून मान्य होतील, असा अंदाज महाविकास आघाडीतच वर्तवला जात आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राजू शेट्टी यांच्या नावांवर फुली बसण्याची दाट शक्यता आहे. मे-जूनपासून विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नामनियुक्त जागा रिक्त आहेत. सरकारने ६ नोव्हेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे नियुक्त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी त्या मंजूर होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक कारणाने कोलदांडा : एकनाथ खडसे भाजपतून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते आहेत. राजू शेट्टी (Raju Shetty) शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते आहेत. या दोघांचा भाजप व देवेंद्र फडणवीस यांना कडवा विरोध आहे. त्यामुळे या दोघांची विधान परिषदेची वाट तांत्रिक कारण देऊन अडवली जाऊ शकते, अशी चर्चा आघाडीत आहे.
Must Read
1) मंदिरं उघडण्याच्या निर्णयावर काँगेस नेत्याचा सवाल
2) दिवाळीनिमित्त भारताला मिळणार सर्वात मोठं गिफ्ट
3) शिर्डीतील साईमंदिर भाविकांसाठी खुलं, मात्र...
4) ऑस्ट्रेलियाचे माईंड गेम सुरू, स्मिथचा टीम इंडियाला इशारा
5) KBC: 5 कोटी जिंकूनही सांभाळू शकला नाही 'लक्ष्मी'
6) पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की...
सहकार-समाजसेवेतून शिफारशी
कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा व सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीची शिफारस सदस्यपदी करता येते. खडसे व शेट्टींच्या शिफारशी सहकार आणि समाजसेवाअंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. त्यावर राज्यपाल बोट ठेवू शकतात.
सहा शिफारशी राजकीय
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी ४ जागा वाटून घेतल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे व राजू शेट्टी, शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन अशा ६ शिफारशी राजकीय आहेत.