kiara advani -movie trailer releasedentertainment center- चित्रपटगृहांत रिलीज होणा-या सिनेमाचे नाव आहे, ‘इंदू की जवानी’. येत्या 11 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा ट्रेलर (movie trailer) रिलज झाला आहे.

या हलक्या-फुलक्या रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) मुख्य भूमिकेत आहे. इंदूची भूमिका ती साकारताना दिसणार आहे. इंदू गाझियाबादची आहे आणि सिंगल आहे. डेटींगसाठी तिला एक हँडसम मुलगा हवा असतो. अशात ती डेटींग अ‍ॅपची मदत घेते. डेटींग अ‍ॅपवर तिला अनेक तरूण भेटतात. पण मनासारखा एकही नाही. अनेक प्रयत्नानंतर इंदूला एक मुलगा आवडतो. मात्र तो पाकिस्तानी निघतो. यानंतर काय घडते अर्थात यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.(entertainment center)

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीवचित्रपटाचा ट्रेलर इंटरेस्टिंग आहे. तितकाच मजेदार आहे. कियाराची अ‍ॅक्टिंग जबरदस्त आहे. अबीर सेनगुप्ताने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. कियारासोबत यात आदित्य सील लीड भूमिकेत आहे. तर मल्लिका दुआ इंदूच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे.याआधी कियाराचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात कियारा अक्षय कुमारसोबत झळकली होती. प्रदर्शनापूर्वी हा सिनेमा बराच वादात सापडला होता. त्याआधी ‘कबीर सिंग’ यात कियारा लीड रोलमध्ये होती. यात ती शाहिद कपूरसोबत दिसली होती. लवकरच कियारा  ‘भुल भुलैय्या 2’मध्ये दिसणार आहे. यात कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये आहे.

कियारा आडवाणीने (kiara advani)  ‘फग्ली’ या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर ‘मशिन’ या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. ‘लस्ट स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला ख-या अर्थाने लोकप्रियता ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी’ या चित्रपटामुळे मिळाली. तिच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली.