karan johar troll


Fabulous Lives Of Bollywood Wives हा नेटफ्लिक्सवरील (netflix) वेब शो काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. काही लोकांना स्टार वाइव्सच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेऊन मजा येत आहे तर काही लोकांना हा शो आवडत नाहीये. पण हा शो लोकांच्या चर्चेचा विषय ठरतोय. या शोमध्ये नीलम कोठारी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडेची पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफची झलक बघायला (Instgram post) मिळते. तसेच यात पाहुणे कलाकार म्हणून अनेक मोठे चेहरेही दिसत आहेत.


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

नुकताच करण जोहरने या चारही स्टार वाइव्ससोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर  (Instgram post) शेअर केला होता. या फोटोला अनेक लाइक्स मिळाले आणि अनेक कमेंट्सही आल्या. या फोटोवर एका ट्रोलरने फिल्ममेकर करण जोहरवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तर करणने त्याला तेवढंच मजेदार उत्तरही दिलं. ट्रोलरने लिहिले की, मला वाटतं आपणा सर्वांनी हे समजून घ्यायला पाहिजे की, 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड (bollywood) वाइव्स' मध्ये सर्वात फेवरेट वाइफ करण जोहर आहे. यावर करण जोहरने ट्विट रिट्विट करत लिहिले की, यावर मला फारच हसू येतंय. चांगला सेन्स ऑफ ह्यूमर असलेले ट्रोल खरंच रिफ्रेशिंग असतात. थॅक्स डॉक्टर.

करण जोहरने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. यात त्याने सांगितले होते की, नीलम, भावना, सीमा आणि महीपसोबत जवळपास २० वर्षे जुनी मैत्री आहे. त्याने लिहिले होते की, आमच्या प्रेम करा किंवा ट्रोल करा, पण आम्हाला माहीत की, तुम्ही आम्हाला इग्नोर करू शकत नाही.