kangana-ranaut-justin-trudeau

बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. यावेळी तिने प्रेषित महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राच्या वादावरुन थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. प्रत्येक छोट्या गुन्ह्याची शिक्षा जर शिरच्छेद करणं असेल तर मग कायद्याची गरजच काय? असा सवाल तिने केला आहे.


Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी


आपण एका आदर्श जगात राहात नाही. प्रत्येकाचं वागणं हे आपल्या नियंत्रणात नसतं. त्यामुळे अनेकदा लोक आपल्या मर्यादा लांघतात. ड्रग्ज घेतात, दुसऱ्यांचं शोषण करतात, त्यांच्या भावना दुखावतात. पण प्रत्येक छोट्या गुन्हाची शिक्षा जर शिरच्छेदच असेल तर मग देशात कायद्याची गरज काय?” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ( Justin Trudeauयांच्यावर निशाणा साधला.


प्रकरण काय आहे?

प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखवून या विषयावर चर्चा घडविणाऱ्या फ्रान्समधील एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. ‘शार्ली एब्दो’वरील हल्ल्याची सुनावणी सुरू झाल्याच्या निमित्ताने पैगंबरांवरील व्यंगचित्रे पुर्नप्रकाशित करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नाराजी व्यक्त केली होती. “आपल्या सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पण हा अधिकार अर्मादित नाही.” असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेवर कंगना रणौतने निशाणा साधला आहे.