madhya-pradesh-bypoll-jyotiraditya-scindi

विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. पण बिहारपेक्षाही वातावरण मध्य प्रदेशात तापलेलं आहे. मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, प्रचारात आरोपप्रत्यारोपांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) व ज्योतिरादित्य शिंदे यांचं सर्वस्व पणाला लागलेलं आहे. प्रचारसभांचा धडाकाच मध्य प्रदेशात सुरू आहे. दरम्यान, एका प्रचारसभेत ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी चक्क काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यावरून चिमटे काढले आहेत.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

काँग्रेस सोडून काही महिने लोटले तरी, भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचा विसर पडलेला नाही, असंच दिसतंय. पोटनिवडणुकीच्या एका प्रचार सभेत याची प्रचिती आली. मध्य प्रदेशात होत असलेल्या पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी झोकून दिलं आहे. काँग्रेस आणि भाजपासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे.

याच निवडणुकीच्या प्रचारात असताना एका सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जनतेला संबोधित केलं. त्यानंतर अचानक हात उंचावत त्यांनी लोकांना आवाहन केलं की, “३ तारखेला होणाऱ्या मतदानावेळी पंजाच्या निशाणी समोरील बटन दाबून काँग्रेसला…” इतकं म्हटल्यानंतर झालेली चूक शिंदे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं. पण हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेत्यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही हा व्हिडीओ ट्विट करत आदत से मजबूर असा टोला लगावला आहे.

“सत्य समोर येण्यास वेळ लागते, पण ते समोर येतंच,” असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

२७ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व भाजपासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या निकालावरच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या सरकारच भवितव्य अवलंबून आहे.