politics


crime- कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिर अखेर सुरू करण्यात आली आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे इथं दोन गटात तुफान हाणामारी (fighting) झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी तालुक्यातील झरे गावात 17 नोव्हेंबर रोजी दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात ही घटना घडली, या प्रकरणी शांताबाई मारुती मासाळ (वय 60) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली  आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर हे  दुपारी आपल्या मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरं सुरू करण्यात आल्यामुळे मंदिराच्या परिसरात साफ-स्वच्छता करण्यात आली होती. पण, ब्रम्हानंद आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली. (crime)

स्थानिकांनी ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्या मित्रांना चपला बाहेर काढून मंदिरात जाण्याची विनंती केली. पण, यावरून दोन्ही गटामुळे वादाला सुरुवात झाली. चपला बाहेर काढण्यावरून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले, दोन्ही गटामध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी (fighting) झाली. या धुमश्चक्रीत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता.

या प्रकरणी आटपाडी गावात राहणाऱ्या शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेत  मंगळसूत्र आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या गाडीतील 82 हजार लांबवण्याचे या तक्रारीत म्हटले आहे.  त्यांच्या तक्रारीवरून  ब्रह्मानंद पडळकर, गणेश भुते नवनाथ मारुती सरगर, अनिल सूर्यवंशी, विठ्ठल पाटील आणि सत्यजीत पाटील या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर ब्रम्हानंद पडळकर यांच्या फिर्यादीवरून मासाळवाडी गावातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा आटपाडी पोलीस अधिक तपास करत आहे.