recharge plan jiotelecom company- टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी 24 दिवसांपासून ते एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असेलेले अनेक प्रीपेड प्लॅन्स (recharge plan)आहेत. जिओकडील सर्वात स्वस्त मोबाइल प्रीपेड प्लॅन 129 रुपयांचा आहे. सविस्तर जाणून घेऊया जिओकडील 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन्सबाबत.

जिओ 129 रुपयांचा प्लॅन :-

जिओच्या (telecom company) 129 रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2 जीबी डेटा मिळतो. 2 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस इतका होतो. याशिवाय जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटे मिळतात.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन :-

जिओच्या 149 रुपयांच्या रिचार्ज पॅकची (recharge plan) व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे. ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा म्हणजे एकूण 24 जीबी डेटा मिळतो. दररोज मिळणारी डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस होतो. यामध्ये ग्राहकांना 100 एसएमएस देखील मोफत मिळतात.

जिओचा 199 रुपयांचा प्लॅन :-

जिओच्या 199 रुपयांच्या रिचार्ज पॅकची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्रीपेड पॅकमध्ये जिओ ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 42 जीबी डेटा मिळतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्स देखील या पॅकमध्ये फ्री मिळेल.