recharge plantelecom- भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म जलद गतीने आपले पाय रोवत आहे. पण यासाठी इंटरनेट डेटाची विशेष गरज असते. अशा परिस्थितीत दूरसंचार कंपन्यांकडून डेटा अ‍ॅड ऑन पॅक लाँच (recharge plan)करण्यात आले आहेत, जे आपल्या रोजच्या अतिरिक्त डेटाची आवश्यकता पूर्ण करतात. 

अशा परिस्थितीत जिओच्या नियमित रीचार्जसह डेटा अ‍ॅड ऑन पॅक घेणे चांगले असते. जिओचा प्रारंभिक अ‍ॅड ऑन रिचार्ज पॅक 151 रुपयांमध्ये येतो. या रिचार्ज पॅकवर 30GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. याशिवाय 201 आणि 251 रुपयांचे रिचार्ज पॅक येतात. हे तिन्ही डेटा अ‍ॅड ऑन पॅक 30 दिवसांच्या वैधतेसह येतात.

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


Jio डेटा अ‍ॅड ऑन रिचार्ज पॅक

जिओकडून वर्क फ्रॉम होम (Work from Home) अ‍ॅड ऑन पॅक अंतर्गत तीन रिचार्ज पॅक सादर केले गेले आहेत. जिओच्या 151 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह 201 रुपये आणि 251 रुपयांचे दोन अन्य प्री-पेड रिचार्ज येतात. 151 रुपयांच्या अ‍ॅड ऑन रिचार्ज पॅकवर (recharge plan) 30GB हाय-स्पीड 4G इंटरनेट अनलिमिटेड डेटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर 201 रुपयांच्या अ‍ॅड ऑन पॅकवर 30 दिवसांसाठी 40GB अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच 251 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 50GB अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो.

केव्हा सक्रिय होतो डेटा अ‍ॅड ऑन पॅक

डेटा अ‍ॅड ऑन पॅक अशा स्थितीत सक्रिय होतो, जेव्हा आपला दररोज प्राप्त होणार डेटा संपुष्टात येतो. याचा अर्थ असा की जर आपल्याला नियमित रीचार्ज पॅकमधून दररोज 3GB डेटा मिळत असेल, जेव्हा आपण दररोज हा 3GB डेटा पूर्णपणे वापरता, तर आपला डेटा पॅक सक्रिय होतो. वापरकर्ता आपल्या गरजेनुसार हा 30GB, 40GB आणि 50GB डेटा एका दिवसात वापरू शकतो किंवा आपल्या गरजेनुसार 30 दिवसांपर्यंत वापरू शकतो. हा 30GB डेटा दररोजचा 3GB डेटा संपल्यानंतर सक्रिय होतो.