ipl-2020

मुंबई (Mumbai Indians)च्या टीमने आणखी एक आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या वर्षीच्या आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव केला. यंदाच्या वर्षात मुंबईच्या विजयात मोलाची कामगिरी केली ती बुमराह आणि बोल्ट या फास्ट बॉलरच्या जोडीने. या मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये 28 रन दिले.

या मॅचमध्ये एकही विकेट न मिळाल्यामुळे बुमराहला सर्वाधिक विकेटसाठी मिळणारी पर्पल कॅपही मिळाली नाही. या मॅचमध्ये बुमराह आणि रबाडा यांच्यात पर्पल कॅपसाठी स्पर्धा होती. बुमराहने या मोसमातल्या 15 मॅचमध्ये 27 विकेट घेतल्या. तर रबाडाने या मोसमात 30 विकेट घेतल्या. आयपीएलच्या पर्पल कॅपबाबत वीरेंद्र सेहवागने Virender Sehwag केलेली भविष्यवाणी त्यामुळे खरी ठरली. कगिसो रबाडाकडेच पर्पल कॅप राहिल, असं सेहवाग आजच्या मॅचआधी म्हणाला होता.

बुमराहला पर्पल कॅप मिळाली नसली, तरी एका आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बुमराहने त्याच्या नावावर केला. या मोसमात बुमराहने 6.73 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली.

बुमराहने या आयपीएलमध्ये दोनवेळा 4 विकेट घेतल्या. हे रेकॉर्ड करणारा तो एकमेव भारतीय बॉलर आहे. या मोसमात त्याने 14 रन देऊन घेतलेल्या 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. दिल्लीविरुद्धच्याच मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतल्या.