ipl-2020-srh-vs-rcb-virat-kohli-explains

सनरायजर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad विरुद्ध ५ विकेटने पराभव पत्करल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीने यामागचे कारण सांगितले. आहे. मॅचमधील स्थिती अचानक बदलले ज्याची टीमला अपेक्षा नव्हती. बंगळूरचे फलंदाज या मॅचमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले. टीम २० ओव्हरम्ये ७ विकेट्सच्या बदल्यात १२० रन्स बनवू शकली. हैदराबादने सहज हा स्कोर पूर्ण केला आणि ५ विकेट्सच्या बदल्यात विजय संपादन केला. 

आम्हाला वाटले १४० पर्यंत स्कोअर जाईल. पण स्थिती अचानक बदलली. ज्याची आम्ही कल्पना केली नव्हती. वातावरण चांगले असेल आणि मैदानात दव नसेल असे आम्हाला वाटले होते असे कोहली म्हणाला. आम्ही बॅटीने हिम्मत नाही दाखवू शकलो. त्यांच्या बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग केली आणि पिचचा चांगला वापर केल्याचे त्याने सांगितले. 

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी


प्लेऑफ बद्दल देखील त्याने भाष्य केले. शेवटची मॅच जिंका आणि टॉप २ मध्ये राहून लीग स्टेज संपवून टाका असे समोर होतो. हे खूप रोमांचक होत चाललंय. २ टीम १४ पॉईंट्सवर आहेत असेही तो म्हणाला. आयपीएल २०२० च्या ५२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह सनरायझर्स अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे.

हैदराबाद संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीचा शानदार खेळ दाखवून खेळ जिंकला. बंगळुरूच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्सने १४.१ ओव्हरमध्ये १२१-५ धावा करून लक्ष्य गाठले. हैदराबादकडून ऋद्धिमान साहाने सर्वाधिक ३९ धावा केल्या.