infiltration-of-two-pakistani-drones-into-indian-border

जम्मू-कश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये (Samba Sector of Jammu-Kashmir) शुक्रवारी सायंकाळी 6  वाजता पाकिस्तानकडून दोन ड्रोन (Drones) पाहण्यात आले आहे. वृत्त संस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, या दोन ड्रोन्सनी आंतरराष्ट्रीय सीमा पार (Crossed International Border) केली. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला. सध्या जवानांनी संपूर्ण भागात नाकाबंदी केली आहे.

पाकिस्तान दल घुसखोरांच्या मदतीसाठी गोळीबार करतात- भारत

भारताने पाकिस्तानवर टीका करीत म्हटलं की, 2003 मध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या करारचं पालन करणं आणि संयम ठेवण्याची पाककडे सातत्याने मागणी केली जात असतानाही पाकिस्तानी दल घुसखोरांच्या मदतीसाठी गोळीबार करतात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांची सातत्याने होत असलेली घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे.


पाकि
त्यांनी एक ऑनलाइन ब्रीफ्रींगमध्ये सांगितलं की, नियंत्रण रेषावर (एलओसी) तैनात पाकिस्तानी दलाच्या समर्थनासाठी अशा प्रकारची घुसखोरी शक्य नसल्याचे सांगितले. संयम आणि शांततेसाठी 2003 मध्ये लागू केलेल्या शस्त्रसंधीच्या कराराचं पालन करण्याची सातत्याने मागणी केली जात असतानाही पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानी उच्चायोगच्या अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने 14 नोव्हेंबर रोजी समन्स बजावले होते आणि 13 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कडक विरोध केला होता. या घटनांमध्ये 4 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 19 जण गंभीर जखमी झाले होते.