heart attack
health tips
- तुम्ही योग्यवेळी आणि आवश्यक तेवढा वेळ झोप घेत नसाल तर, तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याचा धोका उद्भवू शकतो. अमेरिकेन हार्ट (heart attack) असोसिएशनच्या प्रमुख पत्रकात याबाबत एक संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासात, 37 ते 73 वर्षांच्या 4,08,802 व्यक्तींनी सहभाग नोंदवला. या अभ्यास अहवालानुसार, योग्य पध्दतीने झोप घेणाऱ्या लोकांना चुकीच्या पध्दतीने झोप घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत ह्र्द्याविकाराचा धोका कमी असतो. सकाळी वेळेवर उठणे, सात ते आठ तासांची झोप हे झोपेच्या योग्य पध्दतीचे निकष आहेत.


Must Read

1) मोठी बातमी! अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप...

2) चंद्रकांत पाटील यांचा भाजपाकडून तीव्र निषेध

3) एकापेक्षा एक भन्नाट फिचर्स असलेल्या Vivo V20 Pro 5G चं प्री बुकिंग सुरू

4) १ डिसेंबरपासून बदलतोय बॅंकींगचा 'हा' नियम

5) ...तर रोहितचं खेळणं कठीण, रवी शास्त्रींनी व्यक्त केली चिंता


आवश्यक तेवढी झोप घेणं लाभदायक

शांत झोप न लागणं, घोरणं, झोप न येणं आणि रात्रभर जाग राहणे किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ झोपणे आरोग्यासाठी घातक असतं, असं या अहवालात म्हटलं आहे. २६ दशलक्षांहून जास्त लोक हृदयविकाराने ग्रस्त आहेत आणि याचे प्रमुख कारण योग्य पध्दतीने झोप न घेणे हे आहे. (health tips)

न्यू ऑर्लिन्समधील ट्युलेन विद्यापीठाच्या ओबेसिटी रिसर्च सेंटरचे एमडी, पीएचडी, एपिडेमियालॉजीचे प्राध्यापक लू क्वाई यांनी सांगितले की, झोपेत घोरणं, झोप न येणं, सकाळी लवकर जाग येणं आणि रात्रभर जागं राहणं, झोपेची वेळ या पाच बाबींवर झोपेची पध्दत योग्य आहे की नाही हे अवलंबून असतं. आवश्यक तेवढा वेळ झोप घेणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतं, असं संशोधनात आढळलं आहे.

आकडे काय सांगतात

या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या झोपेच्या पद्धती जाणून घेण्यासाठी टचस्क्रीन प्रश्नावली देण्यात आली होती. या लोकांना त्यांच्या झोपेच्या वेळेनुसार, अती कमी झोप, सात तासांपेक्षा कमी वेळ झोप आणि सात ते आठ तास झोप अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं. 

यामध्ये नऊ तासांपेक्षा अधिक काळ झोपणारे किंवा दिवसा झोपणारे अशा लोकांचाही समावेश करण्यात आला होता. या अभ्यासावरून हे लक्षात आलं की, व्यवस्थित झोप घेणाऱ्या लोकांना अयोग्य पध्दतीने झोप घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा (heart attack) धोका 42 टक्के कमी आहे.

सध्याच्या काळात कामाची पध्दतही बदलली आहे. आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कामाच्या वेळा रात्री उशिराच्या असतात, कामाचा ताण असतो. यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळा अनिश्चित असतात. कारखान्यांमध्ये रात्रपाळी करणाऱ्या कामगारांच्या बाबतीतही अशा समस्या दिसून येतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला दिसून येतो.