fire


amravati- जिल्ह्यातील धारणी शहरातील बाजार पेठेला आज सकाळी चार वाजताच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे (fire) दहापेक्षा जास्त दुकाने आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीत जुळून खाक झालेल्या दुकानामध्ये चार मोठ्या कपड्यांच्या दुकानांचा समावेश असल्याने लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे झाले आहे. 

आगीची माहिती मिळताच धारणी नगरपंचायतीच्या अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचुन आग (fire) आटोक्यात आणली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील एसटी बस स्टँड परिसरात असणाऱ्या बाजार पेठेतील एका हॉटेलला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे या दुकानाच्या रांगेत असलेल्या इतरही दुकांन या आगीत पेटले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. 

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?

या आगीत बाजारपेठेत मध्ये असलेले चार मोठे कपडा दुकान चप्पल दुकान, हॉटेल आदी दुकाने आगीत भस्मसात झाले आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप पुढे आले नाही. एन दिवाळीच्या हंगामात दुकानाला लागलेल्या आगी मुळे व्यावसायिक मोठे संकटात सापडले आहे.