voter id


भारतातील (India) सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक  (election) येणार आहे ज्यात प्रत्येकजण आपले प्रतिनिधी निवडणार आहेत. अशावेळी आपल्याला आपल्या वोटर कार्डची आठवण येते. हरवला नसेल किंवा अवैध ठरला नसेल ना अशी काळजी वाटतेच. अलीकडेच अनेक लोकांनी तक्रार केली आहे कि त्यांच्या मोबाईल वर एक कॉल आला ज्यात सांगण्यात आले आहे कि त्यांची वोटर आईडी  (voter id) कॅन्सल करण्यात आली आहे. 

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


अशी बातमी ऐकून होणे साहजिकच आहे. परंतु कोणत्याही कॉल वर डोळे बंद करून विश्वास ठेवणे पण योग्य नाही. अशाप्रकारचे खोटे कॉल्स रोज येत असतात जे मोबाईल यूजर्सना फसवण्याचे काम करतात. अशा गोष्टींमुळे संशय मनात येतोच. कारण असे अनेकदा होते कि लोक मत देण्यासाठी सेंटर वर जातात आणि त्यांना समजते कि लिस्ट मध्ये त्यांचे नावाच नाही. जर तुमच्या मनात पण तुमच्या वोटर आईडी बद्दल एखादी शंका असेल तर आधी ती दूर करून घ्या. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आधी स्वतः तपासा कि तुमचा वोटर आईडी वैध आहे कि नाही.

इलेक्शन कमिशन (election commision) ने नॅशनल वोटर सर्विस पोर्टल तयार केले आहे ज्यात तुम्ही थोडी माहिती देऊनच आपल्या वोटर आईडी कार्डची वैधता जाणून शकता. सर्वात चांगली बाब अशी कि यासाठी तुमच्या हातात वोटर आईडी कार्ड हवा असे नाही. तुमचे नाव आणि क्षेत्राची माहिती देऊन तुम्ही वैधतेची माहिती मिळवू शकता.

वोटर आईडी कार्डच्या वैधतेची तपासणी अशी करा

आपल्या वोटर (voter id) आईडी ची वैधता तपासण्यासाठी सर्वात आधी…

1. तुम्हाला नॅशनल वोटर सर्विस पोर्टल https://www.nvsp.in/ वर जावे लागेल. तिथे डावीकडे सर्वात आधी तुम्हाला ‘सर्च युअर नेम इन इलेक्ट्रल रोल’ चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक करताच एक नवीन विंडो उघडेल. किंवा तुम्ही थेट या लिंक वर क्लिक करून तुमचे नाव शोधू शकता.

2. तिथे तुमच्याकडे दोन पर्याय असतील. पहिला सर्च बाई डिटेल्स अर्थात माहिती देऊन शोधणे आणि दुसरा सर्च बाई ऐपिक नंबर अर्थात ओळखपत्रावरून शोधणे.

3. सर्च बाई डिटेल्स द्वारे सर्च करण्यासाठी तुमच्याकडे वोटर आईडी असणे आवश्यक नाही. यात तुम्हाला आपल्याबद्दल माहिती द्यावी लागेल.

4. जेव्हा तुम्ही हा ओपन कराल तेव्हा सर्वात आधी तुमच्या नावाचा ऑप्शन समोर येईल तिथे तुम्ही तुमचे नाव टाका जे वोटर आईडी मध्ये आहे.

5. त्याखाली वय किंवा जन्म तारखेचा पर्याय असेल. त्याखाली तुमचे राज्य, जिल्हा आणि विधानसभा क्षेत्राची माहिती मागितली जाईल. एवढ्यावरच काम झाले पाहिजे. परंतु न झाल्यास उजवीकडे वडिलांचे नाव आणि लिंगाची माहिती मिळेल.

6. आता खाली कॅप्चा टेक्सट टाकून सर्च अर्थात शोधण्याच्या ऑप्शन वर क्लिक करा. असे करताच तुमच्या वोटर आईडी, वोटिंग सेंटर आणि ओळखपत्र नंबर सहित संपूर्ण माहिती येईल.

वोटर आईडी नंबरने करा सर्च

जर वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही तुमचे नाव वोटर लिस्ट मध्ये शोधू शकला नाहीत तर मग दुसरा पर्याय पण आहे परंतु यात वोटर आईडी नंबर ज्याला एपिक नंबर पण म्हणतात तो लागेल.

1. यासाठी बाजूलाच दुसरी टॅब देण्यात आली आहे तुम्ही त्यावर क्लिक करा.

2. त्यावर क्लिक करताच काही ऑप्शन तुमच्या समोर येतील. यात सर्वात आधी तुम्हाला तुमचा ओळखपत्र नंबर ज्याला एपिक नंबर पण म्हणतात तो टाकावा लागेल.

3. त्यांनतर खाली स्टेट अर्थात राज्य निवडावे लागेल आणि मग सर्वात खाली कॅप्चा नंबर टाकून सर्च करा.

असे करताच संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फुल डिटेल्स बघू शकता. त्यासाठी डावीकडे व्यू डिटेल्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करताच तुमच्या वोटर आईडी कार्ड बद्दल संपूर्ण माहिती येईल.

यात तुमचे नाव, वोटर आईडी नंबर, वडील किंवा पतीचे नाव, निवास स्थान, मतदान क्रम संख्या, मतदान भाग संख्या व्यतिरिक्त तुमच्या क्षेत्रातील मतदान अधिकाऱ्याचे नाव आणि कॉन्टेक्ट नंबर पण तुम्हाला दिसेल.

राज्यानुसार वोटर आईडी लिस्ट

प्रत्येक राज्याद्वारे पण वोटर लिस्ट तयार करण्यात आली आहे. तुम्ही ती पण बघू शकता पुढे आम्ही काही राज्यांच्या पोर्टलची लिंक दिल्या आहेत जिथून तुम्ही तुमचे नाव बघू शकता.

दिल्ली: https://ceodelhi.gov.in/OnlineErms/electorsearchidcard.aspx

बिहार: http://ceobihar.nic.in/searchinroll.html

झारखंड: http://112.133.209.132/election/

उत्तर प्रदेश: http://ceouttarpradesh.nic.in/

उत्तराखंड: http://ceo.uk.gov.in/

राजस्थान: https://ceorajasthan.nic.in/

हरियाणा: http://ceoharyana.nic.in/

गुजरात: https://ceo.gujarat.gov.in/Default

पंजाब: http://ceopunjab.nic.in/english/fper.aspx

मध्य प्रदेश: http://ceomadhyapradesh.nic.in/

छत्तीसगढ़: https://ceochhattisgarh.nic.in/en

हिमाचल प्रदेश: https://himachal.nic.in/index.php?lang=1&dpt_id=6

महाराष्ट्र: https://ceo.maharashtra.gov.in/