helath tips


helath tips- दिवाळीला काही दिवस उरले असताना घराघरातील महिलांची लगबग सुरू असते. आधी साफसफाई, मग फराळ, त्यात शॉपिंगला जायची घाई, घरातील माणसांना, लहान मुलांना कपडे घेऊन द्यायचे. फटाक्याचा हट्ट पुरवायचा. अशी अनेक काम असतात. ज्या स्त्रिया कामाला जातात त्यांना या सगळ्यासाठीसुद्धा वेळ नसतो. कारण कामावरून थकून घरी आल्यानंतर जेवढं जमले तेव्हढं करायचं, बाकीचं नंतर बघू. अशी सगळ्यांची रिएक्शन असते. 

या सगळ्यात महिलांना (woman) आपल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पार्लरला जायचं म्हटलं तर खर्च तर होणारचं पण हवा तसा ग्लो सुद्धा मिळायला हवा. कोरोनाकाळात पैसे आणि वेळ वाचवून अगदी सुरक्षितरित्या तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता. आम्ही तुम्हाला घरच्याघरी फेशियल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.(helath tips

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

फ्रूट फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायद्याचं ठरते. फ्रूट फेशियल फक्त कोणत्याही क्रीमवर अवलंबून नसते. तर ताज्या फळांनीदेखील फ्रूट फेशियलमध्ये मसाज करता येऊ शकतो. ताज्या फळांनी मसाज करताना तुम्ही तुमच्या त्वचेला लागू होत असेल असेच फळ निवडावे. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी केळं, तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी संत्र, अगदीच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी स्ट्रॉबेरी आणि पिगमेंटेशन असणाऱ्या त्वचेसाठी पपई वापरावी.

तुम्हाला या फळांचा अगदी जसाच्या तसा वापर करायचा नसल्यास, बाजारामध्ये या फळांचेच फ्रूट फेशियल क्रीमदेखील उपलब्ध असते. क्लिन्झिंग  मिल्कने ५ ते १० मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा कापसानं पुसावा. त्यानंतर मसाज क्रीम  लावून १५ मिनिटं मसाज करावी.फेशियल करताना पहिले तुमचे केस बांधून घ्या. यासाठी तुम्ही हेअरबँडदेखील वापरू शकता. जेणेकरून तोंडावर केस येणार नाहीत. सर्वात पहिल्यांदा चेहरा साफ करण्यासाठी क्लिन्झिंग करावे. घरी क्लिंजर बनविण्यासाठी एका वाटीत २ चमचे दही आणि १ चमचा मध घ्यावा. आता चेहऱ्यावर हा लेप लावून कमीत कमी ५ मिनिट ठेवावे. त्यानंतर चेहरा साफ करून घ्यावा किंवा तुम्ही आयुर,विट्रो या कंपनीचे क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता. 

त्यानंतर स्क्रब करावं लागेल. घरी स्क्रबर बनविण्यासाठी एक केळं मिक्सरमध्ये १ चमचा दूध, दोन चमचे ओट्स आणि एक चमचा मधाबरोबर वाटून घ्यावे. आता हे तुमच्या चेहऱ्यावर १० मिनिट्सपर्यंत हळूहळू स्क्रब करत राहावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची छिद्र उघडली जातात. त्यानंतर मॉईस्चराईजर त्वचेच्या आत जाऊन त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते. स्क्रबिंगनंतर वाफ घ्या.  स्टिमर नसेल  तर तुम्ही गरम पाणी एका पातेल्यात गरम करून वाफ घेऊ शकता. वाफ घेऊन झाल्यानंतर स्वच्छ टॉवेलनं चेहरा पुसून घ्या. त्यानंतर मसाज क्रिम लावून योग्य दिशेनं त्वचेची मसाज करा. मसाज झाल्यानंतर फेसपॅक लावण्याची वेळ येते.

केळी आणि पुदीन्याची पाने चांगल्याप्रकारे एकत्र करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक तुम्हा आठवड्यातून दोनदा वापरू शकता.  पुदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अॅसिड आढळतं, ज्याने पिंपल्स दूर होतात. तर लिंबू चेहऱ्यावर एकप्रकारे ब्लीचिंगचं काम करतं.पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग झाले असतील तर हा लिंबू आणि पुदीन्या फेसपॅक त्या डागांना कमी करण्याचं काम करतो.

कसा कराल तयार?

लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी १० ते १२ पुदीन्याची पाने घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करा. ही पाने चांगली बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर काही वेळासाठी लावून ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यावर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून २ वेळा लावू शकता.