crime newscrime news- चारित्र्याच्या संशयावरून (molestation) पतीने पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. त्यानंतर मृतदेह पेटवून दिला. हत्येनंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी कळवा पोलिसांनी पतीला अटक केली असून, त्याला 25 डिसेबंरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.लक्ष्मी कटवा (20) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. आकाश मेघजी कटवा (24) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

आकाश आणि लक्ष्मी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांमध्येही किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होते. दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तिच्या चारित्र्यावरील संशयातून (molestation) 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्याने तिच्या गळ्यावर सुरीने वार करून अत्यंत निर्घृणपणे तिचा खून केला. कहर म्हणजे खुनानंतरही त्याने तिच्या अंगावर टर्पेटाईन टाकून तिला पेटवून दिले.(crime news)


Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन


त्यानंतर त्याने स्वत: ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात पत्नीच्या खुनाची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर तो स्वत: कळवा पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्याच्याकडून एक सुराही जप्त केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गोंटे करीत आहेत.