hasan mushrifpolitics of india- मी आणि शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय मंडलिक भाऊ-भाऊच आहोत. खासदार मंडलिक, संजयबाबा घाटगे आणि मी म्हणजे अमर, अकबर आणि ऍन्थनी आहे. जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ (गोकुळ) निवडणुकीत जरा चढाओढ होईल पण आम्ही एकच आहोत. 

संजय मंडलिक आणि आपण 22 वर्ष तर संजयबाबा घाटगे आणि मी सहा विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत. पण, काही माणसं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घेवून आमच्या घरावर आयकरचा छापा टाक, ईडीचा छापा टाक, विधवा महिलांची पेन्शन रद्द करुन त्यांना टाचा घासायला लावण्याचे काम करत आहेत. असे आम्ही कधी करत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. (politics of india)

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव


पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात अरूण लाड आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

श्री मुश्रीफ म्हणाले, संजय घाटगे, संजय मंडलिक आणि माझ्यात काही मतभेद झाले असतील. पण, एकमेकांची कधीही अडवणूक केलेली नाही. निवडणूक झाली की विषय संपला. अस समजून आम्ही काम केले. पण काही माणसं अशी तयार झाली आहेत की आमच्यावर कधी आयकर छापा टाकायला लावायचा, कधी ईडीचा छापा टाकायचा, तसेच भाजप (politics party of india) प्रदेशाध्यक्षांना घेवून विधवा महिलांची पेन्शन रद्द करुन त्यांना टाचा घासायला लावण्याचे काम करत आहेत. अे आम्ही कधीच केले नाही. भविष्यातही आम्ही तिघेही अमर, अकबर आणि ऍन्थनी कागल तालुक्‍याच्या विकासासाठी एकच राहणार असल्याचेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.