Bharatiya Janata Partypolitics- पुणे पदवीधर (graduation)मतदार संघातील लढत संग्रामसिंह देशमुख आणि अरुण लाड यांच्यापेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची लढत आहे. संग्रामसिंह देशमुख यांचे काम मोठे आहे. त्यांच्या विजयासाठी (election) प्रयत्न एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी केले.

पुणे पदवीधर (graduation) मतदार संघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी सांगलीत प्रचार दौरा केला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात बैठक झाली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापालिकेचे नेते नगरसेवक शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, युवा नेते गौतम पवार आदी उपस्थित होते. 

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

आमदार सुरेश खाडे म्हणाले, "पदवीधरचा गड आपल्याला राखायचा आहे. त्यासाठी संग्राम देशमुखांना विजयी करायचे आहे. यापुढे कोणीही विरोधक आपल्या विरोधात उभा राहणार नाही असे काम करायचे आहे. शहर जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे म्हणाले, " भाजपची कामाची पद्धत अन्य पक्षापेक्षा वेगळी आहे. उमेदवार कोण हे न पाहता भाजपचा कार्यकर्ता काम करतो. पदवीधरच्या निवडणुकीत (election) सांगलीकर संग्राम देशमुखांना मोठे मताधिक्‍य देतील. 

मकरंद देशपांडे म्हणाले, पदवीधर मतदार संघाचे मतदार 4.17 लाख आहे. आपली यंत्रणा कामाला लागली आहे. संग्रामभाऊंना सांगली जिल्ह्यातून मोठे मताधिक्‍य देण्याची आपली जबाबदारी आहे. सर्वांनी चांगले काम करा असे देशपांडे यांनी सांगितले. 

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, "माजी मुख्यमंत्री असणाऱ्या डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपच्या ताब्यात जिल्हापरिषद दिली. मला अडीच वर्षे अध्यक्षपद देऊन काम करण्याची संधी दिली. या काळात कोणीही बोट दाखवेल असे काम केले नाही. 

माझे वडील संपतराव देशमुख यांनी 1995साली अपक्ष म्हणून निवडून आल्यावर युतीला पाठिंबा दिला होता आणि भागातील प्रश्नांची सोडवणूक केली होती. आमची त्यावेळेपासून पक्षाची नाळ जोडली गेली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी कोणीही गाफील न राहता ताकदीने काम करा असे आवाहन केले.यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.