पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कामकाज निःपक्षपातीपणे पार पाडावे. तसेच, मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी केले. 

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेसाठी निवडणूक-2020 च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठी मंगळवारी (ता. 17) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक निरीक्षक निलिमा केरकेटा, श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते. 

Must Read

1) खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

2) SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

3) महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा

4) विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

5) ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका


निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरबाबत आवश्‍यक खबरदारी घ्यावी. मतदान केंद्रावर गर्दी होवू नये यासाठी रांग लावणे, मतदारांना माहिती देणे यादृष्टीने मतदान केंद्र व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना जबाबदारी नेमून द्यावी. मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. मतदारांना माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता कक्ष स्थापन करावा, अशा सूचना राव यांनी दिल्या. 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक : 

मतदान तारीख - 1 डिसेंबर (मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत) 
मतमोजणी प्रक्रिया - 3 डिसेंबर (गुरुवार) 

मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना तपासून घ्यावे, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्वतयारी करावी. मतदानास सुरुवात होण्यापूर्वीची कामे वेळेत पार पाडावीत. मतदान केंद्राध्यक्षांची कर्तव्ये, फोटो ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी आवश्‍यक इतर पुरावे, मतदान प्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थिती, मतदान गोपनीय राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, दिव्यांग मतदारांसाठी मतदान, टपाली मतदानाबाबत अतिरिक्‍त जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले. तर, सूत्रसंचालन तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी केले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी आभार मानले.