governor-koshyari

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyariयांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात (notice) सर्वोच्च न्यायालयात धाव (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Moves Supreme Court Against Uttarakhand HC) घेतली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना वापरलेल्या सरकारी निवासस्थानाचे बाजारभाव मूल्यानुसार भाडे वसूल करण्यासंबंधी न्यायालयाने त्यांना अवमान कारवाईची नोटीस बजावली आहे.

भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री असताना तेथील सरकारी निवासस्थान वापरले होते. मात्र या निवासाचे भाडे त्यांनी सरकारी तिजोरीत जमा केले नाही, असा आरोप करणारी जनहित याचिका तेथील उच्च न्यायालयात एका सामाजिक संस्थेने दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने त्यांना सहा महिन्यात जागेचे थकित भाडे आणि पाणी पट्टी व अन्य सुविधांचे भाडे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशांची पूर्तता कोश्यारी यांनी केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का करु नये, अशी नोटीस उत्तराखंड उच्च न्यायालयाने मागील महिन्यात बजावली आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

या नोटीसीला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मी महाराष्ट्रात राज्यपाल पदावर आहे. अशाप्रकारची कारवाईची नोटीस राज्य घटनेच्या अनुच्छेद 361 नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती विरोधात करता येत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. संबंधित थकित रक्कम मनमानीपणे आकारली असून माझी बाजू ऐकून घेण्यात आली नाही, असे कोश्यारी यांचे म्हणणे आहे. अ‍ॅड. अमन सिन्हा यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. नोटीसीला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली आहे. कोश्यारी यांच्याकडे सुमारे 47 लाख रुपयांची वसुली बाकी आहे, असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री पदावर असताना राज्य सरकारने पुरविलेले निवासस्थान, वीज, पाणीपट्टी, पेट्रोल आदी बाबींचा वापर केला होता. ही थकित भाडे रक्कम वसूल करण्याची मागणी याचिकादार संस्थेने केली आहे.