
Must Read
1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर
3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार
4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”
5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव
मीडिया अहवालांच्या मते सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा देते. दरम्यान गुगलकडून नोटीस जारी होऊन WEB APP बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी युजर्स 2021 च्या सुरुवातीपासून Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर नाही करू शकणार. याकरता युजर्सना Google Pay चा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे Google कडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, Google Pay च्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.
जेव्हा तुम्ही एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता तेव्हा पैसे हस्तांतरित होण्यास एक ते तीन दिवस लागतात. डेबिट कार्ड (Debit Card) वापरून त्वरित हस्तांतरित केले जाते. कंपनीने सपोर्ट पेजना अशी घोषणा केली आहे की, जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने पैसे पाठवता तेव्हा 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर शुल्क आकारले जाते.
Google कडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. Googe कडून गेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि ios युजर्ससाठी रोलआउट करण्यात (Debit Card)आले आहेत. कंपनीने Google Pay च्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.