google-pay-to-remove-peer-to-peer-payments-

तुम्ही जर 'गुगल पे'द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करत असाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या गुगल पे ने पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी  (Peer to peer payments facility) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर  (Instant Money Transfers) पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. ज्याकरता युजर्सना काही शुल्क द्यावे लागेल. दरम्यान हे शुल्क किती असेल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे.

मीडिया अहवालांच्या मते सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा देते. दरम्यान गुगलकडून नोटीस जारी होऊन WEB APP बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी युजर्स 2021 च्या सुरुवातीपासून Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर नाही करू शकणार. याकरता युजर्सना Google Pay चा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे Google कडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, Google Pay च्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.

Must Read

1) कडक कारवाई! केंद्र सरकारकडून ४३ मोबाईल ऍप Block

2) Breaking : ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन

3) "महाराष्ट्राप्रमाणे गोव्याला अत्यंत कडक एसओपीची गरज नाही, पण..."

4) बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती

5) ...अन् रोहित शेट्टीच्या डोक्यात फोडली काचेची बाटली: VIDEO

6) डिसेंबरपासून रेल्वेसेवा बंद, रेल्वे मंत्रालय म्हणतं....

जेव्हा तुम्ही एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता तेव्हा पैसे हस्तांतरित होण्यास एक ते तीन दिवस लागतात. डेबिट कार्ड वापरून त्वरित हस्तांतरित केले जाते. कंपनीने सपोर्ट पेजना अशी घोषणा केली आहे की, जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने पैसे पाठवता तेव्हा 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर शुल्क आकारले जाते.

Google कडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. Googe कडून गेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि ios युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहेत. कंपनीने Google Pay च्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.