Gold Rate Today


Gold Rate Today:  भारतामध्ये आजपासून दिवाळीची (Diwali)  खरी धामधूम सुरू झाली आहे. या सणाच्या निमित्ताने अनेकजण सोनं खरेदीला पसंती देतात. धनतेरस (Dhanteras)  दिवशी तुम्ही यंदा खरेदी केलं नसेल तर आज लक्ष्मी पुजनाचा (Laxmi Pujan) दिवस आहे. 

आजच्या दिवशी देखील संध्याकाळी लक्ष्मीपुजनाच्या वेळेस अनेक जण सोनं-चांदी खरेदी करून त्याचं पुजन करतात. यंदा दिवाळीच्या दिवसांत सोनं पुन्हा दरांमध्ये चढ-उतार करताना दिसत आहे. दरम्यान सोन्याची खरेदी ही दागिन्यांसोबतच नाणी, बिस्किटं याच्यामध्येही केली जाते. त्यामुळे त्यांच्या खरेदी विक्रीच्या दरात बदल झालेले बघायला मिळू शकतात. भारतीय बाजारात MCX, सोन्याचे दर हे 51,760 रूपये आहेत तर चांदीचे दर हे 63,310 रूपये आहेत.

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

मुंबई मध्ये आज 10 ग्राम म्हणजेच 1 तोळा सोन्याचा दर (Gold Rate Today) 50,870 24 कॅरेटसाठी तर 22 कॅरेटसाठी 49,870 रूपये आहे. कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्राम सोन्यासाठी दर 53,540 रूपये आहे तर 22 कॅरेटसाठी 49,050 रूपये आहे. दिल्लीमध्ये सोनं खरेदी करत असाल तर 24 कॅरेट्च्या 10 ग्राम सोन्यासाठी 53,630 रूपये आणि 22 कॅरेटसाठी 49,260 रूपये मोजावे लागणार आहेत. चैन्नईमध्ये 22 कॅरेटचा सोन्याचा दर 47,880 हा 22 कॅरेटसाठी आहे. तर 24 कॅरेटसाठी 52,200 रूपये आहे.

दिवाळी, दसरा सह साडेतीन मुहूर्तावर सोनं खरेदी करणं ही शुभ मानली जाते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार या दिवसांत सोनं खरेदी करतात. यंदा अनेक डिजिटल, ऑनलाईन पेमेंट मोडवर देखील सोनं खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये गूगल पे वरही डिजिटल गोल्ड विकत घेता येऊ शकतं. गोल्ड बॉन्ड हा देखील सोनं खरेदीचा पर्याय आता खुला आहे.