gold rate


आज दिवाळी  (diwali) पाडवा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हा दिवस सोने (gold rate), मौल्यवान वस्तू खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे सोन्याची नाणी, वळं, बिस्कीटं, दागिने खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडेल. दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असल्याने या काळात म्हणजे अगदी धनतेरसपासून पाडव्यापर्यंत सोने खरेदी, वस्तू खरेदीला लोक भरभरुन पसंती देतात. त्याचबरोबर आज पाडवा असल्याने नववर्ष आणि पत्नीला ओवाळणीत देण्यासाठी एखादा दागिना यानिमित्ताने देखील खरेदी केली जाईल. तर पाडव्या निमित्त आजचा सोन्याचा दर काय आहे?

दिवाळी सुरु झाल्यापासून सोन्याच्या दरात (gold rate) वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मी पूजना दिवशी देखील सोन्याचे भाव वधारले होते. यापूर्वी कोरोना व्हायरस संकटकाळात सोन्याच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली.


आजचा सोन्याचा दर:

मुंबई -     24 करेट/प्रतितोळा: 50,919 रुपये ,  22 करेट/प्रतितोळा: 49,959 रुपये

पुणे-       24 करेट/प्रतितोळा: 51,015 रुपये,  22 करेट/प्रतितोळा: 48,635 रुपये

नाशिक-  24 करेट/प्रतितोळा: 51,034 रुपये ,22 करेट/प्रतितोळा: 48,614 रुपये

नागपूर-   24 करेट/प्रतितोळा: 51,065 रुपये ,22 करेट/प्रतितोळा: 48,575 रुपये

सोलापूर-  24 करेट/प्रतितोळा: 51,056 रुपये, 22 करेट/प्रतितोळा: 48,596 रुपये

कोल्हापूर-  24 करेट/प्रतितोळा: 51,067 रुपये, 22 करेट/प्रतितोळा: 48,617 रुपये


आपल्याकडे सोन्यासोबतच चांदी खरेदीवर देखील भर दिला जातो. चांदीचे कॉईन्स, मुर्ती, वस्तू या गिफ्ट देण्यासाठी खरेदी केल्या जातात. दरम्यान, आज दिवाळी पाडव्यानिमित्त चांदीचा दर 63,692 प्रति किलो असा आहे.

सध्याच्या डिजिटल युगात (digital)तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. विशेष म्हणजे या पर्यायामुळे कोविड-19 संकटात गर्दीची ठिकाणं टाळता येतील.