gold silver rate



gold silver rate- आज सलग चौथ्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची वायदा किंमत ०. ३ टक्क्यांनी कमी झाली आहे. दरम्यान, ५०,१८० रुपये प्रति तोळा झाली आहे, तर चांदीची वायदा किंमत ०. ८ टक्केने उतरले आहेत. 

आज सोन्याचे भाव जवळपास ४५० रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी (silver) ७१८ रुपयांनी कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ५६,२०० रुपये प्रति तोळा असा उच्चांक गाठला होता. आतापर्यंत यामध्ये साधारण ६००० रुपयांची घसरण झाली आहे. घसरणीनंतरचा भाव ६२,०४३ रुपये प्रति किलो झाला आहे.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट


कोव्हिड-19 व्हॅक्सिन (COVID-19 Vaccine) लवकरच उपलब्ध होईल अशी अपॆक्षा आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव ०. १ टक्क्याने कमी होऊन १,८६९. ८६ डॉलर प्रति औंस झाले आहेत. याठिकाणी चांदीचे भाव ०. ३ टक्क्याने कमी होऊन २४. २४ डॉलर प्रति औंस झाले आहेत. डॉलरने सोन्यावर दबाव वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले (gold silver rate) आहेत.

अनेक कारणांमुळे सोन्याचे दर (gold rate) याच रेंजमध्ये आहेत. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे. सोन्याचे भाव १, ८५० डॉलर प्रति औंसवर पोहोचून देखील ते १,९०० डॉलरच्या स्तरापर्यंत पोहोचले नाही.

Pfizer ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे व्हॅक्सिन ९५ टक्के प्रभावी आहे. या लशीने अमेरिका फूड अँड ड्रग अॅमिनिस्ट्रेशन (USFDA) द्वारे आपातकालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या सुरक्षा मानकांची पूर्तता केली आहे. Pfizer आता येणाऱ्या काही दिवसात अमेरिका आणि युरोपियन नियामकांकडून मान्यता मिळवेल. डॉलर इंडेक्समध्ये ०. ६ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इतर चलन असणाऱ्यांसाठी सोने महागलं आहे.