Toyota car



सणासुदीच्या हंगामातील ऑफरचा काळ निघून गेला आहे, परंतु मोटारीवरील सवलतीच्या ऑफर्स अजूनही सुरू आहेत. उत्सवाच्या हंगामानंतरही टोयोटा तुमच्यासाठी उत्कृष्ट ऑफर घेऊन आला आहे. त्याच्या बऱ्याच वाहनांवर भारी सूट मिळत आहे. कंपनीकडून देण्यात येत असलेल्या ऑफरमध्ये ग्राहक Toyota car 75000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

इनोव्हावर 75,000 रुपयांपर्यंतची भारी बचत

टोयोटा इनोव्हावर (toyota innova) ग्राहक एकूण 75,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. कंपनीकडून 20000 रुपयांची कॅश सूट आणि 25,000 रुपयांचे कॉर्पोरेट बोनस देण्यात येत आहे. त्याचबरोबर जुन्या कार ऐवजी नवीन इनोव्हा खरेदी करून ग्राहक एक्सचेंज बोनस घेऊन 30000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या गाडीची दिल्लीमधील प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 15.66 लाख रुपये आहे.

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

यारीसवर 50 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल

जर आपल्याला टोयोटा यारीस खरेदी करायची असेल तर उत्सवाच्या हंगामात या कारवर एकूण फायदा 50,000 रुपयांपर्यंत मिळू शकेल. कंपनीकडून ग्राहकांना 15,000 रुपयांची कॅश सवलत दिली जात आहे.

त्याच वेळी, एक्सचेंज बोनस / लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत ग्राहक एकूण 15,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. याशिवाय कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना 20,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. या गाडीची दिल्लीमधील प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 8.86 लाख रुपये आहे.

ग्लेन्झावर 30,000 रुपयांपर्यंतची सूट

टोयोटा ग्लेन्झावर (Toyota car ) एकूण 30,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. कंपनीकडून 15,000 रुपयांची कॅश सूट देण्यात येत आहे. त्याच वेळी जुन्या कारच्या बदल्यात नवीन टोयोटा ग्लान्झा खरेदी करून ग्राहक दहा हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतील. याशिवाय कंपनीकडून 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. या गाडीची दिल्लीमधील प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 7.01 लाख रुपये आहे.