fraud-case-file-against-bjp-mla-prashant-bamb

औरंगाबादमध्ये (Aurangabad) भाजपचे आमदार प्रशांत बंब (bjp mla prashant bamb)यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून सभासद तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच बंब यांच्यावर 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा  आरोपही करण्यात आला आहे.

भाजप आमदार प्रशांत बंब (Prashat bombयांच्याविरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. गंगापूर साखर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी  हा गुन्हा दाखल झाला आहे.  प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्र तयार करून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट


गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये म्हणून सभासदारांनी पैसे गोळा केले होते. ही सर्व रक्कम कारखान्याच्या खात्यात आहे. पण या रक्कमेचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असा दावाच कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी केला आहे. त्यामुळे सभासदांनी एकत्र येऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

2013 मध्ये गंगापूर साखर कारखाना विक्रीसाठी काढण्यात आला होता. पण सभासदांनी डीआरटी कोर्टात पैसे जमा केले होते. त्यानंतर हा विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे कोर्टाकडून ही रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा झाली. पण, आता प्रशांत बंब यांनी जमा झालेल्या पैशांवर कारखान्याचा संबंध नसल्याचा अजब दावा केला आहे. त्यामुळे 14 सदस्यांनी बंब यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.