crime news



crime news- नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत एकवटले आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या भाजी बाजारपेठेत दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि तरुणानं गोळीबार (firing) सुरू केला. या गोळीबारात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना कृषी बाजारपेठेत ही धक्कादायक घटना घडली आहे. बाजारपेठेत कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप समजू शकलं नाही पण दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही संतप्त गटांमध्ये अरेरावीची भाषा सुरू झाली. ही धक्कादायक घटना शहरातील कोतवाली ठाणा क्षेत्रातील कृषी बाजापेठेत घडल्यानं खळबळ उडाली आहे. (crime news)


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का




या वादादरम्यान एका तरुणानं बंदुकीनं तुफान गोळीबार सुरू केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (viral video) होत आहे. तरुण गोळीबार करून फरार झाला मात्र या गोळीबारात एक शेतकरी जखमी झाला आहे. या शेतकऱ्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू आहे. मुरैना पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूसं जप्त केली असून आरोपीविरोधात गुन्हा (firing) दाखल केला आहे.