जिल्ह्यात सध्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ह्यमिशन मास्क Mask ही त्रि-दिवसीय मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान विशेष पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून तब्बल २ लाख ५३ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर काही ठिकाणी बेशिस्तांना त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी ह्यमी घराबाहेर पडल्यावर नेहमीच मास्कचा वापर करेलह्ण अशी शपथ देण्यात आली.

अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लोकडाऊन करावे लागले आहे. हिच परिस्थिती वर्धा जिल्ह्यावर ओढावू नये म्हणून सध्या जिल्हा District प्रशासनाच्यावतीने खबरदाराच्या उपायांची प्रभावी अंमलबजाणी केली जात आहे. नियमित मास्कचा वापर हा कोरोनावर प्रभावी खबरदारीचा उपाय आहे. परंतु, सण व उत्सवादरम्यान बाजारपेठेत गर्दी होत असताना अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने ह्यमिशन मास्कह्ण ही मोहीम हाती घेतली आहे. यात आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या लोकांना २ लाख ५४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी सामूहिक शपथ देण्याचा अभिनव प्रयोगही करण्यात आला. एकूणच या मोहिमेच्या माध्यमातून मास्कचा वापर करणे, नियमित हात धुणे आदी विषयाची माहिती नागरिकांना देत त्यावर प्रभावी जनजागृतीही करण्यात आली, हे विषेश.

१२७ व्यावसायिकांना ठोठावला दंड
अनेक दुकानात कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अशा दुकानांवर सध्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत तब्बल १२७ दुकानदारांवर शारीरिक अंतर न ठेवणे, मास्कचा वापर न करणे आणि हात धुण्यासाठी व्यवस्था न उभारणे यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शिवछत्रपतींना साक्षी ठेवून घेतली शपथ
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हिंगणघाट येथे बाजारात प्रत्यक्ष पाहणी करून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात स्वत: हजर राहून बेशिस्तांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी मास्कचा वापर न करताना आढळून आलेल्या ३६ व्यक्तींना शिवछत्रपतींच्या साक्षीने ह्यमी घराबाहेर पडल्यावर नेहमीच मास्कचा वापर करेलह्ण अशा आशयाची शपथ देण्यात आली.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरीचार विभाग करताहेत धडक कारवाई
जिल्हा प्रशासनातील महसूल, पोलीस, ग्रामविकास आणि नगरविकास विभागाचे पथक ही मोहीम राबवित आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या ३७ पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्या १४७ नागरिक, पोलीस विभागाने १९ पथकाच्या सहाय्याने ३९५ व्यक्तींवर, ग्रामविकास विभागाने ५३ पथकाच्या माध्यमातून ३३७ व्यक्ती तर नगरविकास विभागाने २२ पथकाद्वारे ३५७ व्यक्ती अशा एकूण १ हजार २३३ व्यक्तींवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बेशिस्तांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन् आता वाहनही होणार जप्त
वारंवार सूचना देऊनही अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा बेशिस्तांना धडा शिकविण्यासाठी आता मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीचे वाहनच एक दिवसांकरिता जप्त केले जाणार आहे. त्याची नोंद घेतली जाणार आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. मात्र, लोकांच्या मनातील कोरोनाची भीती नाहीशी होऊन लोक मास्क न वापरता बाहेर गर्दीच्या ठिकाणी बिनधास्तपणे वावरताना आढळून येत आहेत. नागरिकांचा असा निष्काळजीपणा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे.