supriya sulepolitics of maharashtra- महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ( Aurangabad Graduate Election) सतीश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या (supriya sule)बनावट आवाजाची एक क्लिप व्हायरल (clip viral) झाली आहे. त्या ऑडिओ क्लिपमुळे मोठा गदारोळ झाला आहे. त्या ऑडिओ क्लिपमधून सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांविरोधात प्रचार करत असल्याचं समोर आलं आहे. त्यावरच आता फेसबुक लाइव्ह (facebook live) करून सुप्रिया सुळेंनी खुलासा केला. 

फेसबुक लाइव्हमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, 'मला काही सहकाऱ्यांचा आणि चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या आवाजाचा आणि खोटा मोबाईल नंबर वापरून आणि लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. हे खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी पातळी सोडून आज आमचे विरोधक प्रचार करत आहेत. (politics of maharashtra)


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का


माझ्या नावाचा गैरवापर

मी तातडीनं पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण म्हणून उमेदवार आहेत, यांनाही मी तातडीनं संपर्क साधलेला आहे. विरोधक जो काही रडीचा डाव खेळत आहेत, तो दुर्दैवी आहे. पदवीधरची ही निवडणूक आहे, औरंगाबादचे आमचे उमेदवार आहेत. कुठलाच विषय राहिला नाही म्हणून विरोधक इतकी पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून एक फेक अकाऊंट (facebook live) , फेक नंबर वापरून आज ते प्रचार (clip viral)  करत आहेत.

यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. कुठल्याही पक्षाचे लोक असतील, पण मला कोणावरही आरोप करायचा नाही. पण हे दुर्दैवी आहे, तंत्रज्ञानाचा गैरवापर आमचे विरोधक करत आहेत. सतीश चव्हाणांना मी विनंती केली आहे की आपण न्याय मागितला पाहिजे. महाविकास आघाडीची अशी खोटी बदनामी कोणीही करू नये. विषय नसतील तर बोलू नका, पण खोटा प्रचार करण्यासाठी माझा आवाज वापरू नका, असं आवाहनही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे.