Eknath Khadsepolitics news - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (Bhaichand Hirachand Raisoni Multistate Co-operative Credit Society)अर्थात बीएचआर (BHR) संस्था घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) आज मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे.  त्यामुळे खडसे कुणाची नावं जाहीर करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळेच  एकनाथ खडसे (Eknath Khadse)  हे आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. (politics new)


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

'या प्रकरणामध्ये बँकेची (bank) मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे, यामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे', असा दावा खडसे यांनी रविवारी केला होता.

तसंच, 'बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. या सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथं अॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केली आहे, असंही खडसे यांनी सांगितले.

राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाची कारवाईही थांबवली होती, असं सांगत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे. पण, बीएआर संस्था ही मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 2002 प्रमाणे संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, त्यामुळे राज्याचे सहकार आयुक्त कारवाई करू शकत नव्हते, त्यामुळे राज्याने आपला अहवाल पाठवून कारवाई थांबवली होती, असंही खडसे यांचं म्हणणे आहे.

'या प्रकरणामध्ये जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशात जर काही माहिती दिली तर चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे आताच नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की दोन दिवसांत संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे', असंही खडसे यांनी सांगितले.

'बीएआर संस्थेतील घोटाळा हा हजारो कोटी किंमतीचा असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक शाखेनं कारवाई सुरू केल्यापासून अनेक राजकीय नेत्यांची नावं समोर येईल असे तर्कवितर्क लावले जात आहे, त्यातच आता एकनाथ खडसे पुराव्यानिशी नाव जाहीर करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खडसे नेमकं कोणत्या नेत्यांची नावं जाहीर करतात, हे पाहण्याचे ठरणार आहे.