eight-year-old-granddaughter-of-bjp-mp-rita-bahuguna-joshi

उत्तर प्रदेशच्या भाजप खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी (BJP MP Dr Rita Bahuguna Joshi) यांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाके फोडताना जळून मृत्यू झाला. 6 वर्षांची नात किया जोशी रात्री फटाके फोडताना गंभीर जखमी झाली. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात कियाला दाखल केले तेव्हा ती 60 टक्के भाजली होती. प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच किया जोशीचा मृत्यू झाला.

मंगळवारी कियाला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीला हलविण्यात येणार होते, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. कियाच्या अकस्मित निधनामुळे खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Must Read

1) भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
2) राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण
3) दोन देशांसह पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा
4) धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?
5)केंद्र सरकार मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये भरणार?
6) CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर

खासदार रीता जोशी यांनी अपघातानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सीएम योगी यांच्याशी बोलून उपचारांसाठी मदत मागितली होती. त्यानंतर रीता जोशी यांच्या नातीवर दिल्लीतील सैनिकी रुग्णालयात उपचार होणार होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांसोबत फटाके फोडत असताना एक फटाका फुटला आणि किया गंभीर जखमी झाली. 6 वर्षीय कियानं काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात दिली होती. तिच्यावर गुडगावच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. अलाहाबाद लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रीता जोशी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत.