health tips - egghealth tips- अंडी (egg) शरीरासाठी फायदेशीर असतात. कमीत कमी पैश्यात अंड्यांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात. म्हणूनच अंड्याला सुपरफूड असंही म्हटलं जातं. उकळून, अंड्याची पोळी करून किंवा करी तयार करून अनेकांच्या घरी अंडी खाल्ली जातात. जे लोक व्यायाम करतात त्यांना रोज सकाळी किंवा संध्याकाळी अंडी खायची सवय असते. पण जास्त अंडी खाणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून अंड्यांच्या सेवनाबाबत एक खुलासा करण्यात आला आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

या अभ्यासातून दिसून आलं की, जास्त अंडी खात असलेल्यांना डायबिटीसचा (diabetes) धोका असतो. चायना मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटीच्या एका नवीन अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. रोज एकापेक्षा जास्त अंड्याचे सेवन केल्यास डायबिटीसच्या धोका ६० टक्क्यांनी वाढतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासातून दिसून आलं की, नेहमी अंडी खाण्याच्या सवयीमुळे लोकांच्या शरीरात प्रति ग्राम अंड्यांची वाढ होते. या अभ्यासातून दिसून आलं की, ३८ ग्राम अंडी खाल्याने डायबिटीसचा धोका जवळपास २५ टक्क्यांनी वाढला होता. रोज ५० ग्रामपेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने हा धोका ६० टक्क्यांपर्यंत वाढला होता. (health tips)

अंड्यांचे (egg) सेवन आणि डायबिटीस (diabetes) यांतील संबंधांवर नेहमीच वाद होतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खाण्या पिण्याच्या सवयी आणि टाईप २ डायबिटीसमध्ये घनिष्ठ संबंध आहे. खाणं पिणं नियंत्रणात ठेवून डायबिटीसला नियंत्रणात ठेवता येऊ शकतं. जगभरात दिवसेंदिवस डायबिटीसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील ६ टक्के लोकांना चुकीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीसच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य खाणं पिणं असणंही तितकंच गरजेचं आहे.

डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी हिरव्या भाज्याचे सेवन करायला हवे. पालक, कारली, ब्रोकली, गाजर, मेथी, टॉमॅटो, शतावरी, हिरवे वाटाणे यांसारख्या भाज्यांचे सेवन करायला हवे. यातील एंटीऑक्सिडेंट्समुळ हृदय आणि डोळे चांगले राहतात. जेवणात साखरेचे प्रमण वाढल्यास जास्त स्टार्च असलेल्या भाज्यांचे सेवन करू नये. डायबिटीजच्या समस्येचा सामना करावा लागल्यास बटाटा, फूलकोबी, मक्का, मटार, छोले, मसूरची डाळ या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.