diwali 2020

diwali- जी भेटवस्तू आपल्या आर्थिक आघाडीवर प्रभाव पाडणारी असते, अशा भेटवस्तू देऊ नयेत, असे सांगितले जाते. दिवाळीच्या निमित्ताने नेमक्या कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू देणे टाळावे वा कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू न देणे हिताचे (horoscope)ठरू शकेल, जाणून घेऊया…

सोने-चांदीची नाणी

दिवाळी (diwali) म्हणजे रंग आणि प्रकाशाचे पर्व. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने दिवाळीला सोने-चांदी खरेदीवर भर दिला जातो. सोने-चांदी ही अक्षय्य संपत्ती मानली गेली आहे. अनेक व्यापारी दिवाळीला आपल्या नव्या हिशेबाला सुरुवात करतात. अनेक घरांमध्ये सोने-चांदीची नाणी भेट म्हणून दिली जातात.

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

ज्योतिषशास्त्रानुसार (horoscope), लक्ष्मी देवी किंवा कुबेर यांचे चित्र असलेली सोने-चांदीची नाणी कधीही भेट म्हणून देऊ नये, असे सांगितले जाते. अशा प्रकारची सोने-चांदीची नाणी भेट म्हणून दिल्यास त्याचा आपल्या भाग्यावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे दिवाळीला भेट म्हणून देताना लक्ष्मी देवी किंवा कुबेराचे चित्र असलेली सोने-चांदीची नाणी भेट म्हणून देऊ नयेत

​लक्ष्मी देवीची मूर्ती

दिवाळीला सोने-चांदीच्या नाण्यांसह अन्य वस्तू किंवा गोष्टी भेट म्हणून दिल्या जातात. त्यात देवतांच्या मूर्ती भेट देण्यावर अधिक भर दिला जातो. यामध्ये अनेकविध देवी-देवतांच्या मूर्तींचा समावेश असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीला लक्ष्मी देवीची मूर्ती भेट म्हणून अजिबात देऊ नये.

असे केल्यास आपल्या सौभाग्य, समृद्धीवर त्याचा थेट प्रभाव पडतो. लक्ष्मी देवीची मूर्ती भेट देणे म्हणजे आपल्याकडील लक्ष्मी दुसऱ्यांना देणे, असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी देवीची मूर्ती दिवाळीच्या निमित्ताने भेट म्हणून देऊ नये.

​गृहपयोगी वस्तू

दिवाळीला सोने-चांदीसह गृहपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. ज्यांना सोने-चांदीसारख्या महागड्या वस्तू भेट म्हणून देणे शक्य नसते, अशा ठिकाणी गृहपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, चाकू, सुरी, कात्री, सोलाणे, किशणी अशा प्रकारच्या टोकदार वस्तू भेट म्हणून देऊ नयेत. इतकेच नव्हे, तर टोकदार वस्तूंची दिवाळीला खरेदीही करू नये, असे सांगितले जाते. असे केल्यास कौटुंबिक नातेसंबंधातील तणाव येऊन मतभेदाचे प्रमाण वाढू शकते.

असे केल्याने त्याचा थेट प्रभाव आर्थिक स्थितीवर पडू शकतो. रोख पैसे देणे नुकसानकारक ठरू शकते. रोख पैसे भेट म्हणून देणे म्हणजे घरी आलेल्या लक्ष्मीला, कुबेराला दुसऱ्यांकडे सोपवणे, असे समजले जाते. या मान्यतेमुळे दिवाळीला रोख पैसे देणे टाळावे

ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या संपूर्ण पाच दिवसांमध्ये धने देऊ नयेत, असे सांगितले जाते. धने हे धनवृद्धीकारक मानले गेले आहेत. लक्ष्मी देवीला पूजनात धने अर्पण केले जातात. त्यामुळे दिवाळीला धने भेट म्हणून देणे टाळावे, असे सांगितले जाते.