dhanteras 2020diwali 2020 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर (dhanteras 2020) सोन्या चांदीच्या किमतीत वाढ (gold silver price)झाली आहे. स्थानिक बाजारांमध्ये याच दिवशी सोन्याला मागणी वाढल्याने मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. दिवाळीच्या दिवसात लोक सोनं -चांदीचे दागिने खरेदी करतात. त्यातून आता लग्नसराईचे दिवसही जवळ आहेत. 

त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. याच कारणामुळे शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, जाणकारांच्या मते पुढच्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाही.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत


दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये धनत्रयोदिशेच्या दिवशीच (diwali) सोन्याच्या दरात वाढ झाली.  सोन्याची नवी किंमत या बाजारात 241 रुपये प्रति तोळ्याने जास्त (gold silver price) झाली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 10 ग्रॅमला  50,425 रुपये वर पोहोचला आहे. यापूर्वीचा गुरुवारचा दर 50,184 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,880 डॉलर प्रति औन्स एवढा राहिला.

वाळीत जर तुम्ही सोनं (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या शुद्धतेबद्दल माहित असणं आवश्यक आहे. कारण बर्‍याच वेळा ग्राहक सोन्याची शुद्धता ओळखत नाहीत, यामुळे त्यांचे नुकसान होते. सोनं खरेदी करण्याआधी तुम्हाला 14 कॅरेट ते 24 कॅरेटपासून सोन्याची किंमत माहित असावी. आज आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BSI ) मते सोन्याची शुद्धता तपासण्याचे चार प्रमुख मार्ग आहेत.