Disha Patani


बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या फिटनेस आणि बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते. दिशा नेहमीच सोशल मीडियावर (social media) स्वत:चे फोटो, व्हिडीओज् शेअर करते. नुकताच दिशाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी घालून समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दिशा पटानीचा (Disha Patani)  हा बोल्ड फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर टागर श्रॉफच्या आईने आणि बहिणीनेही कॉमेंट केली आहे. आएशा श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफने या फोटोंवर कॉमेंट्स केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दिशाच्या या फोटोंना तिचे अनेक फॅन्सही कॉमेंट्स करत आहेत.
सध्या दिशा आणि टायगर श्रॉफ (Tiger Shorff) मालदिवमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. दिशा आणि टायगर मालदिवला वेगवेगळे गेले पण, त्यांनी एकाच वेळी मालदीवमधील शेअर केलेल्या फोटोंना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या.दिशा पटानीसोबतही टायगर काही फोटो शेअर (social media) केले आहेत. एका फोटोमध्ये तो आपली बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्याच्या हॉट शर्टलेस फोटोवर अनेक तरुणी घायाळ झाल्या आहेत.