Honda bikeहोंडा (Honda) मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली Dio चे Repsol Honda एडिशन भारतात लाँच केले आहे. या मॉडलमध्ये Repsol Honda MotoGP रेसिंग टीम वर बेस्ड नवीन ग्राफीक्स आणि कलर दिले आहेत. नवीन एडिशन होंडाचे ८०० वे ग्रँड विनचे उत्सव सुरू आहेत. जे ऑक्टोबर २०२० मध्ये आले होते.

Dio Repsol Honda एडिशनची एक्स शोरूम किंमत ६९ हजार ७५७ रुपये आहे. तर कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, या एडिशन मॉडलची या आठवड्या पासून सुरूवात होणार असून होंडाच्या डिलरशीपकडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?


डिओ मध्ये रेपसोल होंडा मोटो जीपी बाईकने प्रेरित आहे. जबरदस्त कलर कॉम्बिनेशन दिले आहेत. नवीन कलर शिवाय, या स्कूटरमध्ये कोणताही जास्त बदल पाहायला मिळू शकणार नाही. तसेच याच्या इंजिन मध्ये सुद्धा काही बदल केलेला नाही. या होंडा डिओ मध्ये ग्राहकांना ११० सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे ७.६८ बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि ८.७९ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. यात फ्यूल इंजेक्शन टेक्नोलॉजी चा वापर करण्यात आला आहे.

होंडाच्या (Honda) रेसिंग डीएनए संबंधी बोलताना होंडा मोटरसायकलने म्हटले की, होंडाच्या इतिहासात रेसिंगचे खास स्थान राहिलेले आहे. आपल्या सुरुवातीला होंडा आणि रेपसोल रेस ट्रॅक वर विजय मिळवत तसेच त्याची ८०० वी मोटोची भावना समजते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही भारतात रेसिंग प्रेमीसाटी डिओ चे रेपसोल होंडा एडिशन आणले आहे.