dhanjay-munde-order

 बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुर्डी परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी विशेष पथके नेमावीत आणि या भागात नागरिकांमध्ये पसरलेली दहशत तातडीने कमी करावी, असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Guardian Minister Dhananjay Munde) यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Must Read

1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?

3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघा

5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे हे मंगळवारी सायंकाळी शेतीला पाणी द्यायला गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गर्जे याचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मुंडे यांनी दुःख व्यक्त केले असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेनुसार मृत गर्जे यांच्या कुटुंबियांना रोख पाच लाख रुपये व त्यांच्या पाल्यांच्या नावे मुदत ठेव (एफडी) दहा लाख असे एकूण 15 लाख रुपये देण्याचेही धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या परिसरातील बिबट्या जेरबंद करून त्याची दहशत लवकरच संपवण्यात येईल, याबाबत वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. स्वत: सतर्क राहावे आणि आपल्या जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यात तसेच बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील अफवांमुळे वन विभागाची बऱ्याचदा दिशाभूल होत आहे. तसेच ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे याबाबत अफवा पसरवू नये आणि वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.