dhananjay-munde-admitted-to-lilavati-hospital

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द धनंजय मुडेंनी याबाबत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

Must Read

1) भिडे गुरूजींचा निशाणा

2) एकनाथ खडसे संतापले, म्हणाले...

3) जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा'

4) मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच...

5) कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला

ट्विटरवर ट्विट करत ते म्हणाले, 'तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे.' असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. 

शिवाय प्रकृती स्थिर असल्याचे सांगत उपचार घेवून लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल असं देखील ते म्हणाले आहेत.