deepika padukoneentertainment center
- बॉलिवूडमध्ये (bollywood) अशा अनेक जोड्या आहेत ज्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण.खरं तर दीपिका आणि रणबीर यांचा ब्रेकअप होऊन बराच काळ उलटला आहे. हे दोघंही त्यांच्या आयुष्यात पुढे मार्गस्थदेखील झाले आहेत. मात्र, आजही त्यांच्या नात्याविषयी रोज चर्चा रंगताना दिसतात.

Ranbir Kapoor


दीपिका-रणबीरचा ब्रेकअप जरी झाला असला तरीदेखील हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा दीपिका रणबीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

अलिकडेच दीपिकाने रणबीरसोबतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.दीपिकाने शेअर केलेले फोटो पाहून अनेक जण थक्क झाले असून हे फोटो यापूर्वी दीपिका किंवा रणबीरने कधीच शेअर केले नव्हते. (entertainment center)


इम्तियाज अली यांचा तमाशा हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात दीपिका-रणबीरने एकत्र स्क्रीन शेअर केली होती.नुकतेच या चित्रपटाला ५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने दीपिकाने रणबीरसोबतचे सेटवरील बिहाइंड द सीनचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दीपिका-रणबीरच्या काही सीनचं चित्रीकरण होताना दिसत आहे.हे फोटो शेअर करत दीपिकाने केवळ #5YearsOfTamasha, #5YearsofTara #RanbirKapoor इतकीच कॅप्शन दिली आहे.