deepika and ranveer singh


बॉलिवूड (bollywood) अभिनेता रणवीर सिंगने नुकतेच सोशल मीडियावर पत्नी दीपिका पादुकोणसोबत रोमँटिक फोटो शेअर (social media)केले आहेत. रणवीरने दीपिकासोबतचे फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रणवीरने फोटो शेअर करत लिहिले की, अनंत काळासाठी आत्मा एकमेकांशी जोडून राहू देत..लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी बाहुली. तर दीपिका पादुकोणनेदेखील नवरा रणवीर सिंगला या प्रेमाचे उत्तर हटके अंदाजात दिले आहे.

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

दीपिका पादुकोणनेदेखील तेच फोटो शेअर करत लिहिले की, एका मटारच्या टरफल्यात दोन मटारचे दाणे.. हॅप्पी सेकंड अॅनिव्हर्सरी. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देत आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा बासूपासून कतरिना कैफ आणि अनीता हसनंदानीने शुभेच्छा दिल्या (social media) आहेत. 


दीपिका पादुकोणचे नाव काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. जेव्हा सुशांत सिंग राजपूत -रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणी एनसीबी टीमने दीपिका पादुकोणची चौकशी केली होती.एनसीबी टीमने यावेळी जवळपास ६ तास दीपिकाची चौकशी केली होती.


दीपिका पादुकोण सध्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत दिग्दर्शक शकुन बत्राच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या चित्रपटात काम करत आहे. याशिवाय नाग अश्विनच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे.तर रणवीर सिंग रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या सर्कसमध्ये दिसणार आहे.