politics news of maharashtra- ajit pawar



politics news of maharashtra- सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून कर्ज  (bank loan) मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून हमी देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सोडले होते. त्यापाठोपाठ आता आजारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सोडले आहे. यापुढे या समितीचे अध्यक्ष सहकारमंत्री असणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अवसायानात काढलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीच्या मंत्रिमंडळ समितीत जुलै 2020 मध्ये बदल करण्यात आला होता. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष सहकारमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री असतील अशी सुधारणा करण्यात आली होती.(politics news of maharashtra

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

19 नोव्हेंबर 2020 रोजी या समितीमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. ही समिती पुन्हा पाच जणांचीच करण्यात आली असून उपमुख्यमंत्र्यांना (ajit pawar) त्यातून वगळण्यात आले आहे. सहकारमंत्री समितीचे अध्यक्ष असणार आहेत.