politics of india-sanjay raut


politics of india- शिवसेनेचं (Shiv sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून भाजप (BJP) नेत्यांना सणसणीत टोला लगावला. भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील (Maharashtra) त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मराठी जनतेला पडत आहेत. 

भाजपातील 'उपऱ्यां'नी विजयोत्सव साजरा केला आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. त्याला भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. 'सामना' हे काही दिशा देणारं दैनिक नाही, असंही ते यावेळी म्हणाले. (politics of india)

प्रवीण दरेकर हे पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी आज पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाकरे सरकारमध्ये कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. राज्यातील लोकांचा आघाडी सरकारवर विश्वास उडाला आहे. 

हिंदुत्त्वाचा भगवा कोणाच्या हाती द्यायचा हे मुंबईकरच मनपा निवडणुकीत ठरवतील. भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी शिलसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.