बिहार विधानसभा निवडणूकांमध्ये (bihar elction)एनडीएच्या घटक पक्षांना मोठा विजय मिळाला. जनता दल युनायटेडचे नितीश  कुमारच बिहारचे मुख्यमंत्री असतील असे भाजपने आधीच जाहीर केले होते. यावरून महाराष्ट्रातील शिवसेना भाजपच्या ताटातूटीच्या राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


बिहारमध्ये एनडीएला (bihar elction) बहुमत मिळाले आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरी देखील जेडीयुच्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पद सांभाळावे असे एनडीएच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने दिलेला शब्द पाळला असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार म्हटले जात आहे. परंतु याच मुद्द्यावर वेगळे झालेल्या शिवसेना - भाजपच्या नात्यावर राजकीय चर्चा रंगत असताना, भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

'' बिहारमध्ये आम्ही जदयूला आम्ही शब्द दिला होता तो आम्ही पाळला. महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द आम्ही दिलाच नव्हता असं भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी  एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे न दिलेल्या शब्दाचा शिवसेना हट्ट धरत होती का? याबाबत राजकीय चर्चांना उधान आले आहे. आता शिवसेनेकडून याबाबत काय प्रतिक्रीया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.